Tuesday, December 31, 2024

झुनो जनरल इन्शुरन्सकडून यंदाच्या सणासुदीत नवीन उत्पादने, ईव्ही इन्शुरन्स विक्रीत 20% वाढीची नोंद;


मुंबई, 31 डिसेंबर 2024 (NHM):
झुनो जनरल इन्शुरन्स, पूर्वी एडलवाइज जनरल इन्शुरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन युगातील डिजिटल विमा कंपनीने या सणासुदीच्या हंगामात विक्रीत 20% इतकी वाढ नोंदवली आहे, तर कंपनीने प्रीमियम/हप्ता संकलनात 41% वृद्धीचा अनुभव घेतला. मोटर इन्शुरन्स उत्पादनाला असलेली मोठी मागणी ही डिजिटल-स्नेही ग्राहकांच्या सर्जनशील आणि गुंतागुंत-मुक्त विमा पर्यायाच्या वाढत्या लोकप्रियेतीची पावती आहे.

झुनोच्या मोटर विम्यात त्याच्या ईव्ही विमा प्रस्ताव, अनुरूप उत्पादन प्रस्ताव आणि मूल्यवर्धित सेवांवर जोरदार लक्ष केंद्रित केल्यामुळे प्रचंड वाढ झाली. कंपनीने खासगी कार विमा कंत्राटांसाठी वाढत्या मागणीचा अनुभव घेतला. शून्य-घसारा आणि रोडसाइड असिस्टन्सयासारख्या लोकप्रिय ऍड-ऑन्सना ग्राहकांकडून बरीच मागणी आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील सणासुदीच्या काळात जोरदार मागणी होती. मात्र सप्टेंबरमध्ये सणासुदीचा हंगाम सुरू होऊनही, पावसाळा लांबल्याने उद्योगातील विक्रीवर परिणाम दिसून आला.झुनोच्या यशाचे श्रेय त्याच्या डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनास देता येईल. या दृष्टिकोनामुळे विमा उत्पादनांचे वितरण कशाप्रकारे होते आणि त्यांचे व्यवस्थापन पुन्हा परिभाषित करण्यात आहे. झुनोने विमा प्रक्रिया सुलभ केली. ज्यामुळे पॉलिसी जारी करणे, दाव्यांची प्रक्रिया आणि नूतनीकरण जलद आणि अधिक सुलभ झाले आहे. पे-अॅज-यू-ड्राइव्ह आणि पे-हाउ-यू-ड्राइव्ह यासारखी टेलीमॅटिक्स-आधारित उत्पादने सादर करण्यावर कंपनीचे लक्ष केंद्रित करण्यालाही गती मिळाली. सणासुदीच्या काळात पॉलिसीच्या विक्रीतील दोन अंकी वाढ ही अखंड, तंत्रज्ञान-सक्षम विमा पर्यायांसाठी ग्राहकांची वाढती मागणी अधोरेखित करते.

झुनो जनरल इन्शुरन्सचे चीफ टेक्निकल ऑफिसर नीतिन देव म्हणाले, “या सणासुदीच्या हंगामात नाविन्यपूर्ण आणि सहज उपलब्ध विमा उत्पादने उपलब्ध करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. विक्रीतील 20% वाढ आमच्या प्रस्ताव (ऑफर)वरील वाढता विश्वास दर्शवते. विशेषतः जेव्हा आम्ही वाहनांच्या मागणीत वेगवान बदलाची अपेक्षा करत आहोत. ईव्हीला ग्राहक पसंती मिळत असल्याने, आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे त्यांच्या आवश्यकतेला पूरक विमा-उपाय वितरीत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

झुनो जनरल इन्शुरन्सने जुलै-सप्टेंबर आर्थिक वर्ष 25 मध्ये मोटर इन्शुरन्सच्या एकूण दाव्यांमध्ये 26.4% वाढ नोंदवली. देशभरातील वाढत्या पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे ही वाढ दिसून आली. अपवादात्मक ग्राहक अनुभव देण्यासाठी कंपनीने जलद आणि अखंडित दावे निकाली काढण्याला प्राधान्य दिले. आर्थिक वर्ष 25 मध्ये सर्वाधिक भरणा केलेला दावा रुपये 11,28,680 होता, तर सर्वात कमी 1,665 रुपये होता. विविध राज्यांमधील पुराच्या दाव्यांच्या विभाजनामुळे विशेषतः गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात नुकसानीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले. कोणत्याही अनुचित घटनेच्या वेळी वाहनांच्या सर्वांगीण संरक्षणासाठी ग्राहकांनी इंजिन संरक्षण कवच, रोडसाइड असिस्टन्स (रस्त्याच्या कडेला सहाय्य), नट, बोल्ट, स्क्रू, इंजिन तेल, कूलंट आणि पुराच्या वेळी अनेकदा नुकसान झालेल्या इतर वस्तूंसारख्या उपभोग्य वस्तूंचे कवच, इनव्हॉईस कव्हरवरील परतावे आणि शून्य घसारा कवच यांचा विचार केला.

आपल्या वृद्धी धोरणाचा भाग म्हणून झुनो जनरल इन्शुरन्स भारतातील स्पर्धात्मक विमा बाजारात आपल्या पाऊलखुणा विस्तारण्याचा विचार करते आहे. झपाट्याने बदलत असलेल्या बाजार गरजा गाठण्यासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि धडकेदार प्राइज मॉडेल बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे. वेगवान डिजिटल पायाभूत सुविधा आणि ग्राहक-केंद्री पद्धतीसह झुनो भविष्यात वृद्धीच्या संधींचे समीकरण जुळविण्याकरिता उत्तम स्थितीत आहे.
-----

No comments:

Post a Comment

Quartz processor Midwest Ltd raises Rs 135 crore from anchor investors

MUMBAI, 14 OCTOBER, 2025 (NHM/ SPM📞8108510506):  Quartz processor Midwest Limited, India’s largest producer of Black Galaxy and Absolute Bl...