MUMBAI, JUNE 5, 2024 (NHM)– We are thrilled to announce the 2nd exclusive Silver Exhibition in India called Silver Show of India (SSI) at Jio convention centre, BKC Mumbai, an extraordinary showcase of exquisite artistry and timeless elegance in the world of silver craftsmanship. This landmark event will take place from 7th June to 10th June, 2024, at the prestigious JIO Convention Center, BKC, Mumbai.
Wednesday, June 5, 2024
Thursday, May 30, 2024
आमदार महेंद्र थोरवेंकडून जीवाला धोका - भाजप कार्यकर्ते ॲडव्होकेट ऋषिकेष जोशी यांचा गंभीर आरोप; कर्जतमध्ये गुन्हे वाढले
ॲड. ऋषिकेष जोशी |
कर्जत, 30 मे २०२४, प्रतिनिधी (NHM): कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून याबाबत मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, रायगड जिल्हा पोलिस प्रशासन थोरवे यांच्या दहशतीखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे कार्यकर्ते ॲड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.
ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवे यांच्या दहशतीबद्दल आणि त्यांच्या वरदहस्ताखाली सुरु असलेल्या अनधिकृत कामांबद्दल आरोप केले. जोशी म्हणाले, कर्जत शहरात भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या समोर असलेल्या खुल्या मैदानात व्यायामशाळा बांधण्याच्या नावावर व्यावसायिक दुकान गाळे बांधले आहेत. याची चौकशी करावी याबाबत कर्जत पोलिसांत तक्रार केली. तसेच माझ्या जीवाला त्यांच्याकडून धोका संभवतो, असा आरोप जोशी यांनी केली आहे.
ॲड. जोशी म्हणाले, याबाबत मी चार महिन्यांपूर्वी पत्र दिले आहे. एकमहिन्यापूर्वी तक्रार देखील दिली. मात्र माझा जबाब घेतला जात नाही. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला आमदार थोरवे जबाबदार असतील, अशी तक्रार केली आहे. मात्र रायगड जिल्हा पोलिस प्रशासन आमदारांच्या दहशतीखाली काम करत आहे, असा आरोप अँड. जोशी यांनी पत्रकारपरिषदेत केला.
यावेळी ॲड. जोशी म्हणाले, कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाला. तो गुन्हा एलसीबीकडे न देता त्याचा तपास कर्जत पोलिसांनीच केला. तसेच पळसदरी तलावात एक प्रेत सापडले आहे. याची कोणाला कल्पना नाही. तसेच पूर्वी भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या आणि सध्या शिंदे गटात काम करणाऱ्या आरती माळवे यांचा पळसदरी रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करत स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज का उठवला नाही असा सवाल केला, याबाबत सीबीआयतर्फे चौकशी करावी व या घटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
कर्जत विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. कर्जत, खोपोली, नेरळ, माथेरान पोलीस स्टेशनमध्ये त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्टेशन डायऱ्या तपासा त्यांनी डायऱ्यांमध्ये थेट राजकीय दबाव आल्याचे नमुद केले आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते पोलिसांवर राजकीय दबाव आहे, हे पोलिस नमुद करतात हे फार गंभीर आहे. यामध्ये कोणतीही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुखांकडून होत नाही. असे देखील अँड. जोशी म्हणाले.
चौकट :
पांडूरंगाची मुर्ती स्मशानभूमीच्या जागेत !
नगर परिषद हद्दीत प्रति आळंदी व पंढरपूर उभारण्यात आले आहे. येथे श्रीराम पुलानजीक पांडुरंगाची ५१ फूट मूर्ती बसवण्यात आली आहे. त्या मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात होते. मात्र, ज्या जागेवर ही मूर्ती बसविली आहे. ती जमिन स्मशानभूमीची आहे, असा गौप्यस्फोट ॲड. ऋषिकेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांची फसवणूक करुन या मुर्तीचे उद्घाटन केले. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात यावी असे जोशी म्हणाले. या प्रकरणी जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
Runwal Unveils its most prestigious tower- Breeze at its Landmark Project – Runwal Lands End, Kolshet, Thane
MUMBAI, 30th MAY, 2024 (NHM): Runwal, one of the prominent real estate developers in Mumbai, has unveiled its finest tower – Breeze, part of their marquee project – Runwal Lands End, Kolshet’s finest gated community in the Thane region. The tower, Breeze, offers 500+ units in 1-2 BHK configurations, available for buyers at Rs 62 Lacs – 1.10 Cr. The Tower has already received a phenomenal response from the past couple of weeks.
With a tower designed to provide space and privacy, the entire development boasts more than 70% open area. This new tower offers Vaastu-compliant homes, each providing a breathtaking panoramic view of the expansive green landscape and an overview of the Ulhas River. The spectacular view reflects a sense of calm and tranquillity.
The development is designed to align with the vision of creating a harmonious convergence of land, water, and sky, optimizing the natural beauty of the region. This also resonates with Runwal’s vision of creating new and elevated urban living spaces that cater to the evolving new-age buyers.
Runwal Lands End is designed for those who seek serene and comfortable living. The development has seven towers, spread across 10 acres of land and are nestled among 1,600 acres of lush green scenery. It also features one of the largest multilayered clubhouses in the region and an impressive array of over 70 resort-style amenities spread across 6 acres, offering breathtaking views of the Ulhas River from every home. Exclusive amenities include a putting golf area, a sunrise gazebo, a swimming pool, multi-purpose courts, a dance arena, and a sand beach, along with about 1 lac sq. ft. of vehicle-free podium area, ensuring a lifestyle of luxury and leisure.
Commenting on the new tower launch, Mr. Sandeep Runwal, Managing Director of Runwal, stated, “We’re thrilled to present Runwal’s latest tower – Tower Breeze at Runwal Lands End. The new tower launch is to cater the exceptional living experiences of our buyers. The new tower exemplifies our commitment to crafting extraordinary living spaces that blend luxury, comfort, and innovation. With its contemporary design, top-notch amenities, and convenient location, Runwal Lands End sets a new benchmark for luxury living.”
With extensive infrastructure development and multi-modal connectivity, Kolshet, Thane emerges as a lucrative location for developers. The serenity and high AQI of the region add to the environment-friendly living experience. Additionally, socio-economic development with a plethora of educational institutions and leisure options, such as various shopping and dining experiences in the vicinity, has been another key contributor to the overall demand in the region.
Key infrastructure developments in Kolshet include the proposed Kolshet-South Mumbai-Vasai Waterway, Mumbai Metro Lines 4 and 5, the Borivali-Thane Tunnel, and Thane Road, which will improve connectivity. Proposed projects like the link road to Bhiwandi Naka and an underground railway to CSMT will further enhance accessibility. These advancements signify Kolshet's socioeconomic growth and its evolution into a thriving urban centre.
About Runwal:
Founded in 1978, Runwal is a major player in Mumbai's real estate scene. They focus on residential, commercial, and retail projects, with a commitment to putting customer needs first throughout the entire development process. This is reflected in their successful track record of over 42 completed projects, creating happy homes for over 35,000 families. Runwal offers a variety of residential options, including luxury apartments, premium housing, and large-scale townships. They also boast the largest retail mall chain in Mumbai, managing malls like the renowned R City, Ghatkopar. With 14 ongoing projects underway, they continue to develop Mumbai and the surrounding region.
Monday, May 27, 2024
सुधाकर घारेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले
मुंबई, मे २७, २०२४ (NHM): काल रविवार दिनांक २६ मे रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात कर्जत तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी आपल्याला मतदानादिवशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून विश्वासात न घेतल्याची आणि दुय्यम वागणुक दिल्याची खंत बोलुन दाखवली.
यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकुण घेत झालेले सर्व विसरुन जाऊयात आणि नव्या दमाने आता विधानसभेच्या कामाला लागुयात या शब्दात आपल्या कार्यकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घेत आपले स्पष्टीकरण दिले तसेच याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम केल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगीतले. तसेच आपल्या भाषणात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत त्यांनी आता विधानसभेच्या तयारीला लागण्याचा संदेश सर्वांना दिला.
या विधानसभेला महायुतीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असेल हे सांगायलाही ते विसरेल नाही. एकंदरीत लोकसभेच्या निकालापुर्वीच सुधाकर भाऊ घारे विधानसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र कर्जत खालापूर मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान यानिमीत्ताने काही पक्षप्रवेश आणि पदनियुक्तया देखील करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
माझ्या कार्यकर्त्यांचा मला गर्व - सुधाकर घारे
रविवारी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्याच झाल अस की मावळ लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीवेळी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी भाऊंना फोनद्वारे त्यांना शिंदे गटाचे कार्यकर्ते सामावून घेत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचा उल्लेख करत आपल्याला निवडणूकीदरम्यान काही गालबोट लागु द्यायचे नव्हते त्यामुळे मी याच्यावर आजवर बोललो नसल्याचे सुधाकर भाऊ घारे यांनी सांगीतले. अशाही परिस्थितीत माझ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याचे काम प्रामाणिकपणे केले याचा मला गर्व आहे.
यावेळी बोलताना त्यांनी याअगोदर महाविकास आघाडीत असताना शेकापच्या उमेदवाराला निवडूण आणण्यात राष्ट्रवादीने आपली पुर्ण ताकद लावली होती आणि तो उमेदवार निवडूण देखील आणला होता. त्यामुळे आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिकपणे काम करतो. कुणी म्हणत असेल राष्ट्रवादीने काम केल नाही तर त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे असे सुधाकर भाऊ म्हणाले. ४ जुनला असेही प्रत्येकाचा बुथ आणि ग्रामपंचायतला किती मतदान झाले हे समजेल हे सांगायला ते विसरले नाहीत.
आमचा पैलवान सांगेलत्याच्याशी कुस्ती खेळायला तयार : २०१७ च्या जिल्हापरिषदेलाच तुम्हाला चितपट केले
दरम्यान लोकसभा निवडणुकीपुर्वी शिंदे गटाच्या एका नेत्याने कुस्ती करायला मैदानात या अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. रविवारी सर्वसाधारण सभेत बोलताना त्या वक्तव्याची आठवण करुन देत आपण त्या संबंधित व्यक्तीला २०१७ च्या जिल्हापरिषदेच्या निवडणुतीतच चितपट केल्याचे सांगीतले. याचसोबत आताही आमचा पैलवान सांगताल त्याच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे असे म्हटले. एकंदरीत आता लोकसभेची निवडणून संपल्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर असणारा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटाचा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवले जाईल - सुधाकर भाऊ घारे
दरम्यान मागील काही दिवसापासुन तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्याचवेळी पाणीटंचाई या अडचणींचा सामना सामान्य नागरीकांना करावा लागत आहे. याची दखल घेत सुधाकर भाऊ घारे नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास प्रशासनाची सुद्धा मदत घेत आहेत. त्याचवेळी रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी गरज असेल त्या सर्व भागात टॅंकरने पाणी पोहचवा अशा सुचना सर्वांना दिल्या. पहिला पाऊस पडेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवा असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. गेले अनेक दिवसांपासून कर्जत खालापूर मध्ये अनेक ठिकाणी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकरने पाणी वाटप करण्यात येत आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या कार्यालयात बसुन फक्त आढावा घेतल्याच्या बातम्या येत असतानाच सुधाकर घारे थेट लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे पाहून सामान्य जनतेला खूप मोठा आधार मिळत आहे.
राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची मालिका पुन्हा सुरु होणार
सुधाकर घारेंच्या नेतृत्वात मागील काही महिण्यांपासुन प्रत्येक रविवारी विविध पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये होणारे पक्षप्रवेश लोकसभा निवडणुदरम्यान महायुतीत काही वाद नको म्हणून थांबवण्यात आले होते. दरम्यान रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सुधाकर भाऊ घारे यांनी पु्न्हा एकदा प्रत्येक रविवारी होणारे पक्षप्रवेश सुरु होतील असे सुतोवाच केले. विधानसभा निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सुधाकर घारे यांनी पक्षविस्तार करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. आता पुन्हा कोणत्या पक्षातील मोठी नावे सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे पाहण्यासारखे असेल.
Sunday, May 26, 2024
OJAS EYE HOSPITAL OFFERS ELITA SILK, A REVOLUTIONARY VISION CORRECTION PROCEDURE THAT HEALS PATIENTS FASTER
MUMBAI, 26 MAY, 2024 (NHM): One of the most staggering trends in the Eye Care has been the rapid rise of myopia (distance vision impairment). Today, around 30% of the global population suffers from myopia, and it is projected to affect 50% by 2050, making it an alarming issue, affecting 5 billion people! Treatment options for myopia include spectacles, contact lenses, or refractive surgery to correct a patient’s refractive error and improve distance vision.
NAVNEET RADIATION CARE CENTER LAUNCHED AT MIRA ROAD BY JOINT EFFORT OF NAVNEET PARIVAR AND RUNANUBANDH TRUST
Tuesday, May 21, 2024
सुधाकर भाऊ घारे यांनी दिल्या कर्जत मधील नुकसानग्रस्थ भागांना भेटी : गरजुंना मदत करत शासनाकडुन नुकसानभरपाई भेटण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन
मुंबई, 21 मे, 2024 (NHM): मागील आठवडाभरात अवकाळी पावसाने बरेच नुकसान केले. यामध्ये प्रामुख्याने विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीजप्रवाह खंडीत झाला आहे. पोशीर ग्रामपंचायत भागातील तसेचे शेलु ग्रामपंचायत भागातील अनेक ग्रामस्थांनी सुधाकर भाऊ घारे यांना फोन करुन आपल्या अडचणी सांगीतल्या.
त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सुधाकर भाऊ घारे यांनी घटनास्थळी भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेलेले होते. ग्रामस्थांना सुधाकर भाऊंशी बोलताना भावना अनावर झाल्या. घराचे छत उडुन गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी होते. परंतु आपल्या अडचणी समजुन घेण्यासाठी आपला नेता आला याचाही सर्वांना खुप आधार वाटला.
यावेळी ठरावीक कुटुंबाना भाऊंनी तात्काळ वयक्तिक मदत केली. तसेच झालेल्या नुकानीची शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी त्वरीत पंचनामे करण्याची विनंती शासकिय अधिकाऱ्यांना केली. विजप्रवाह खंडीत झाल्याने अनेक कामे ठप्प पडली आहेत त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर काम करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन दिल्या.
Celebrating a decade of clay on 23rd & 24th Nov, 2024 at Vintage Garden, Bandra
MUMBAI, 22 NOVEMBER, 2024 (NHM): The Studio Potters Market, Bandra is an annual event happening on the 23rd and 24th Nov, 2024. 11 am to 8 ...
-
मुंबई, 21 मे, 2024 (NHM): मागील आठवडाभरात अवकाळी पावसाने बरेच नुकसान केले. यामध्ये प्रामुख्याने विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीजप...
-
ॲड. ऋषिकेष जोशी कर्जत, 30 मे २०२४, प्रतिनिधी (NHM): कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून याबाबत मी पोलिसांकडे तक...
-
“Koi Kasar Nahi Chhodenge” campaign to commence on 6th December. Campaign also features the league’s ambassador Harbhajan Singh Gearing ...