Monday, May 27, 2024

सुधाकर घारेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले




मुंबई, मे २७, २०२४ (NHM):
काल रविवार दिनांक २६ मे रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात कर्जत तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी आपल्याला मतदानादिवशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून विश्वासात न घेतल्याची आणि दुय्यम वागणुक दिल्याची खंत बोलुन दाखवली.

यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकुण घेत झालेले सर्व विसरुन जाऊयात आणि नव्या दमाने आता विधानसभेच्या कामाला लागुयात या शब्दात आपल्या कार्यकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घेत आपले स्पष्टीकरण दिले तसेच याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम केल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगीतले. तसेच आपल्या भाषणात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत त्यांनी आता विधानसभेच्या तयारीला लागण्याचा संदेश सर्वांना दिला.

या विधानसभेला महायुतीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असेल हे सांगायलाही ते विसरेल नाही. एकंदरीत लोकसभेच्या निकालापुर्वीच सुधाकर भाऊ घारे विधानसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र कर्जत खालापूर मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान यानिमीत्ताने काही पक्षप्रवेश आणि पदनियुक्तया देखील करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.




माझ्या कार्यकर्त्यांचा मला गर्व - सुधाकर घारे

रविवारी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्याच झाल अस की मावळ लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीवेळी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी भाऊंना फोनद्वारे त्यांना शिंदे गटाचे कार्यकर्ते सामावून घेत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचा उल्लेख करत आपल्याला निवडणूकीदरम्यान काही गालबोट लागु द्यायचे नव्हते त्यामुळे मी याच्यावर आजवर बोललो नसल्याचे सुधाकर भाऊ घारे यांनी सांगीतले. अशाही परिस्थितीत माझ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याचे काम प्रामाणिकपणे केले याचा मला गर्व आहे.

यावेळी बोलताना त्यांनी याअगोदर महाविकास आघाडीत असताना शेकापच्या उमेदवाराला निवडूण आणण्यात राष्ट्रवादीने आपली पुर्ण ताकद लावली होती आणि तो उमेदवार निवडूण देखील आणला होता. त्यामुळे आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिकपणे काम करतो. कुणी म्हणत असेल राष्ट्रवादीने काम केल नाही तर त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे असे सुधाकर भाऊ म्हणाले. ४ जुनला असेही प्रत्येकाचा बुथ आणि ग्रामपंचायतला किती मतदान झाले हे समजेल हे सांगायला ते विसरले नाहीत.

आमचा पैलवान सांगेलत्याच्याशी कुस्ती खेळायला तयार : २०१७ च्या जिल्हापरिषदेलाच तुम्हाला चितपट केले

दरम्यान लोकसभा निवडणुकीपुर्वी शिंदे गटाच्या एका नेत्याने कुस्ती करायला मैदानात या अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. रविवारी सर्वसाधारण सभेत बोलताना त्या वक्तव्याची आठवण करुन देत आपण त्या संबंधित व्यक्तीला २०१७ च्या जिल्हापरिषदेच्या निवडणुतीतच चितपट केल्याचे सांगीतले. याचसोबत आताही आमचा पैलवान सांगताल त्याच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे असे म्हटले. एकंदरीत आता लोकसभेची निवडणून संपल्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर असणारा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटाचा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.




मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवले जाईल - सुधाकर भाऊ घारे

दरम्यान मागील काही दिवसापासुन तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्याचवेळी पाणीटंचाई या अडचणींचा सामना सामान्य नागरीकांना करावा लागत आहे. याची दखल घेत सुधाकर भाऊ घारे नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास प्रशासनाची सुद्धा मदत घेत आहेत. त्याचवेळी रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी गरज असेल त्या सर्व भागात टॅंकरने पाणी पोहचवा अशा सुचना सर्वांना दिल्या. पहिला पाऊस पडेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवा असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. गेले अनेक दिवसांपासून कर्जत खालापूर मध्ये अनेक ठिकाणी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकरने पाणी वाटप करण्यात येत आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या कार्यालयात बसुन फक्त आढावा घेतल्याच्या बातम्या येत असतानाच सुधाकर घारे थेट लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे पाहून सामान्य जनतेला खूप मोठा आधार मिळत आहे.

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची मालिका पुन्हा सुरु होणार

सुधाकर घारेंच्या नेतृत्वात मागील काही महिण्यांपासुन प्रत्येक रविवारी विविध पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये होणारे पक्षप्रवेश लोकसभा निवडणुदरम्यान महायुतीत काही वाद नको म्हणून थांबवण्यात आले होते. दरम्यान रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सुधाकर भाऊ घारे यांनी पु्न्हा एकदा प्रत्येक रविवारी होणारे पक्षप्रवेश सुरु होतील असे सुतोवाच केले. विधानसभा निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सुधाकर घारे यांनी पक्षविस्तार करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. आता पुन्हा कोणत्या पक्षातील मोठी नावे सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे पाहण्यासारखे असेल.

No comments:

Post a Comment

ADVOCATE SANDEEP DATTU KATKE TO ADDRESS PUBLIC KEY ISSUES FOR DHARAVI CONSTITUENCY ASSEMBLY

Dharavi, Mumbai, Maharashtr a, 17 November , 2024 (NHM) – Independent candidate Sandeep Dattu Katke, who is running for the 178 Dharavi Ass...