● वल्लममधील प्लाण्टमुळे तमिळनाडूतील नवीनीकरणीय ऊर्जा परिसंस्थेला मोठी चालना मिळणार
● विक्रम सोलारची एकूण उत्पादन क्षमता आता झाली ९.५ गिगावॉट
कोलकाता, भारत (न्यूज हब प्रतिनिधी): विक्रम सोलार या भारतातील सोलार पीव्ही क्षेत्रातील आद्य कंपनीने तमिळनाडूतील वल्लम येथील अत्याधुनिक उत्पादन आस्थापना कार्यान्वित झाल्याची घोषणा आज केली. त्यामुळे कंपनीच्या प्रगत प्रारूप उत्पादन क्षमतेत ५ गिगावॉटची भर पडली आहे. या अतिप्रगत विस्ताराच्या माध्यमातून कंपनीची एकूण उत्पादन क्षमता ९.५ गिगावॉट झाली आहे आणि सौरऊर्जा तंत्रज्ञानातील व्याप्तीआधारित आघाडीची कंपनी हे स्थान आणखी दृढ झाले आहे. तसेच भारताच्या सौरऊर्जाविषयक भवितव्याला आकार देण्यातील कंपनीचे वाढते योगदानही अधोरेखित झाले आहे.
भविष्यकाळासाठी सज्ज, मोठा आवाका असलेले उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यात आलेला वल्लम प्लाण्ट भारताने पर्यावरणपूरक ऊर्जा परिसंस्थेच्या दिशेने घेतलेल्या तंत्रज्ञानात्मक भरारीचे प्रतीक आहे. अतीप्रगत स्वयंचलनाचा आधुनिक स्तर यात सामावलेला आहे, यातील बहुतांश ऊर्जा भारतात प्रथमच वापरात आणली जात आहे. रोबोटिक्स, प्रगत साहित्य हाताळणी प्रणाली, सर्वसमावेशक अंगभूत दर्जा तपासणी आणि स्वयंचलित पॅकेजिंग यांचे अखंड एकात्मीकरण या प्लाण्टमध्ये करण्यात आले आहे. हे उच्च दर्जाचे स्वयंचलन स्थापत्य उत्पादनातील अचूकता सुधारते, निष्पत्तीला वेग देते, प्रक्रियेची खात्रीशीरता भक्कम करते आणि मोठ्या प्रमाणावरील कार्यात्मक उत्कृष्टतेचा नवीन मापदंड स्थापित करते.
२७,००० चौरस मीटर जागेत पसरलेल्या या प्लाण्टची बांधणी प्रगत टॉपकॉन तंत्रज्ञानावर आधारित आहे, अखंडित एचजेटी अपग्रेड्सच्या दृष्टीने त्याचे इंजिनीअरिंग करण्यात आले आहे आणि एम-टेन, जी-ट्वेल्व्ह आणि जीट्वेल्व्हआर फॉरमॅट्सना अनुकूल ठरेल अशा पद्धतीने त्याचे डिझाइन करण्यात आले आहे. भविष्यकालीन तंत्रज्ञानाबाबत नेतृत्वाची भूमिका बजावण्याप्रती विक्रम सोलारची बांधिलकी यातून अधोरेखित होते.
ग्राहकांसाठी नवीन आस्थापनेचे रूपांतर थेट अधिक मूल्य व कामगिरीमध्ये होणार आहे. प्लाण्टच्या प्रगत स्वयंचलनामुळे सातत्यपूर्ण उत्पादन दर्जाची खातरजमा होणार आहे, त्याची परिणती अपयशाची कमी संभाव्यता व दीर्घकालीन टिकाऊपणा देणाऱ्या अधिक खात्रीशीर मोड्युल्समध्ये होणार आहे. स्वयंचलित अचूकता अधिक उच्च कामगिरीला चालना देते व ऱ्हास कमी करते, परिणामी उत्पादनाच्या जीवनकाळात ऊर्जेचे उत्पादन अधिक चांगले होते. तुलनेने कमी दोष आणि अधिक खात्रीशीर पुरवठा यांच्या माध्यमातून ग्राहकांना अपेक्षेप्रमाणे डिलिव्हरी मिळणार आहे आणि उत्पादन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. प्रत्येक मोड्युल श्रेणी-१ व आंतरराष्ट्रीय दर्जा मानक यांची पूर्तता करणारे आहे, त्यामुळे ग्राहक सुरक्षित, समाधानकारक व जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाबाबत आश्वस्त राहू शकतात.
तमिळनाडूतील पर्यावरणपूरक ऊर्जा उत्पादन परिसंस्थेत वाढ करण्याप्रती विक्रम सोलारची बांधिलकी वल्लम प्लाण्टच्या कार्यान्वयनामुळे दृढ झाली आहे. सध्या कंपनी ओरागदममध्ये काम करत आहे, ते कार्यक्षेत्र आता आणखी विस्तारले आहे. तसेच आगामी गंगाईकोंडन कारखान्याच्या पायाभरणी समारंभानंतर लगेचच वल्लम प्लाण्ट कार्यान्वित झाला आहे, त्यामुळे राज्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतातील नवीनीकरणीय ऊर्जेच्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या केंद्रांपैकी एक समजल्या जाणाऱ्या तमिळनाडूमध्ये प्रगत सौरऊर्जा उत्पादन व ग्रीन-टेक नवोन्मेष यांचे नेतृत्व करण्याचे विक्रम सोलारचे दीर्घकालीन धोरण या सर्व प्रकल्पांमधून दिसून येते.
विक्रम सोलारचे चेअरमन तसेच व्यवस्थापकीय संचालक श्री. ग्यानेश चौधरी म्हणाले:
“वल्लम हा विक्रम सोलारसाठी तसेच भारतातील सौरऊर्जा उत्पादन प्रवासातील महत्वपूर्ण टप्पा आहे. वर्षभरातच हा ५ गिगावॉट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करणे धाडसाचे होते आणि तो पूर्ण करण्यातून पुढील दशकाच्या दृष्टीने आवश्यक असलेला आवाका, वेग व नवोन्मेष यांबाबतची आमची सज्जता दिसून येते. आम्हाला या उद्योगक्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळ झालेला असताना, भविष्यकाळात काही बाबींना आकार देण्याची आमची इच्छा या प्रकल्पातून व्यक्त होते: प्रगत उत्पादन, स्वयंचलनावर आधारित दर्जा आणि या क्षेत्रासाठी नवीन मापदंड ठरू शकतील असे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स यांवर आम्ही काम करत आहोत. वल्लम प्लाण्टमुळे भारताची मूल्यसाखळी अधिक सशक्त झाली आहे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाबाबत जागतिक स्तरावर केवळ सहभागी होण्याची नव्हे तर नेतृत्व करण्याची क्षमता भारतामध्ये आहे हा आमचा आत्मविश्वासही त्यामुळे दृढ झाला आहे.”
वल्लम आस्थापनेत उत्पादित मोड्युल्सचा पुरवठा भारतभरातील ग्राहकांना केला जाणार आहे, त्यामुळे देश नवीनीकरणीय ऊर्जेसंदर्भातील आपल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, युटिलिटी-स्केल विकासकांना, सीअँडआय ग्राहकांना तसेच वितरित ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना मदत मिळणार आहे.
समावेशक वाढीप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करत प्लाण्टच्या तळाच्या मनुष्यबळात ४०-५० टक्के लिंगभाव वैविध्य साध्य करण्यासाठी विक्रम सोलार प्रयत्नशील आहे. भारतात आधुनिक, समताधारित आणि भविष्यकालीन वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.


